प्लेटो

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

प्लेटो

प्लेटो (ग्रीक: Πλάτων, प्लेटॉन, पसरट) ( इ.स.पू. ४२८/४२७-इ.स.पू. ३४८/३४७) हा प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञ आणि अथेन्समधील प्लेटॉनिक अकादमी या तत्कालीन महाविद्यापीठाचा संस्थापक होता. आपल्या गुरू सॉक्रेटिस आणि शिष्य अ‍ॅरिस्टॉटल यांच्यासमवेत प्लेटोने नैसर्गिक तत्त्वज्ञान, शास्त्र आणि पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाचा पाया घातला. प्लेटोवर सॉक्रेटिसच्या शिकवणीबरोबरच त्याच्या अकाली मृत्यूचा मोठा प्रभाव होता. पाश्चात्य राजकीय विचारवंतांमध्ये प्लेटोचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. राजा हा राज्याच्या दृष्टीने सर्वश्रेष्ठ आहे. राजाची आज्ञा सर्व प्रजेने मानली पाहिजे. भूतलावरील परमेश्वराच दैवी अंश म्हणजे राजा आहे. राजाज्ञा ही प्रमाण मानून प्रजेने राजाच्या प्रती समर्पीत असले पाहिजे. राजा हा एकाच वेळी प्रजापालक व प्रजापिता ही आहे. शासन करण्याचा अधिकार जन्मतः राजाला प्राप्त आहे. यासंदर्भामध्ये प्लेटोने आपल्या राजकीय विचारांची मांडणी केलेली आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →