प्लेटो आणि ॲरिस्टॉटलचा अनुकृती सिद्धांत

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

पाश्चात्य साहित्यिक आद्य तत्त्वज्ञ सोक्रेटीसचा शिष्य आणि आणि ॲरिस्टॉटलचा गुरू असणाऱ्या प्लेटोने साहित्याच्या सैद्धांतिक निरूपणाचा पाया घातला. कला म्हणजे अनुकरण किंवा अनुकृती (Art is Imitation) हा सिद्धांत प्लेटोच्या काळापर्यंत परिचित झालेला होता. ईश्वरकृत आदर्श हीच वास्तविक सत्ता असते, या आदर्श विश्वाची अनुकृती म्हणजे कला होत. Imitation या शब्दाचा मूळ ग्रीक धातू mimeisthai असा असून त्याचा अर्थ दुसऱ्याने केले तसे करणे हा आहे. परंतु ग्रीक भाषा व्यवहारात या धातूची व्याप्ती अनुकृती करणे, दर्शन घडवणे, निर्देश करणे, आविष्कृत करणे अशी झालेली दिसते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →