प्लॅनेट मराठी ही एक भारतीय सबस्क्रिप्शन व्हिडिओ ऑन-डिमांड ओव्हर-द-टॉप स्ट्रीमिंग माध्यम सेवा आहे जी मराठीत कार्यक्रम प्रदान करणारे भारतातील पहिले डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. प्लॅनेट मराठीने सुरू झाल्यापासून ५५०,००० हून अधिकवेळा इंस्टॉल आणि २४ दशलक्षाहून अधिक व्हिडिओ प्ले केल्याचा दावा केला आहे.
प्लॅनेट मराठीने मराठी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांची संस्थापक मंडळात नियुक्ती केली होती. कार्यक्रमांचे संचालक अभिजित पानसे होते.
अमृता खानविलकर, तेजस्विनी पंडित, संजय जाधव, सोनाली कुलकर्णी, प्रसाद ओक, सिद्धार्थ जाधव या लोकप्रिय मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या उपस्थितीत माधुरी दीक्षित यांच्या हस्ते या व्यासपीठाचा शुभारंभ मुंबईत करण्यात आला होता.
प्लॅनेट मराठी
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.