प्लांट्स व्हर्सेस झोम्बीज हा पॉपकॅप गेम्स यांनी तयार केलेला टॉवर डिफेन्स प्रकारचा एक दृश्य खेळ आहे. तो ओएस एक्स व मायक्रोसॉफ्ट विंडोजवर खेळता येतो. या खेळात एक घरमालक असून त्याच्याकडे विविध प्रति-झोम्बी प्लांट्स (झाडे) असून त्यांचा वापर करून त्याला त्याचे "मेंदू खाण्यासाठी" आलेल्या झोम्बींना पराभूत करता येते. मे ५, २००९ रोजी हा खेळ प्रथम प्रकाशित झालाव त्याच दिवशी तो स्टीमवरदेखील प्रकाशित झाला. आयओएस व आयपॅडसाठी साठी तो फेब्रुवारी २०१० मध्ये प्रकाशित झाला. आयपॅडमध्ये या खेळात उच्च स्पष्टता आहे. एक्सबॉक्स लाइव्ह आर्केडसाठीही हा खेळ उपलब्ध असून तो सप्टेंबर ८, २०१० रोजी प्रकाशित झाला. पॉपकॅप गेम्स एक निटेन्डो डीएस आवृत्ती जानेवारी १८, २०११ रोजी प्रकाशित केली. को-ऑप व व्हर्सेस प्रकारांसह प्लांट्स व्हर्सेस झोम्बीजची प्लेस्टेशन ३ आवृत्ती फेब्रुवारी २०११ मध्ये प्रकाशित झाली. त्याची ॲन्ड्रॉइड आवृत्ती ॲमेझॉन ॲप स्टोरमध्ये मे ३१, २०११ मध्ये प्रकाशित झाली. फेब्रुवारी १६, २०१२ रोजी त्याची ब्लॅकबेरी प्लेबुकसाठीची आवृत्ती प्रकाशित झाली. विंडोज व मॅक आवृत्त्यांमध्ये नवीन गेम ऑफ द इयर आवृत्तींमध्ये झोंबाटारसारख्या अनेक नवीन सुविधांची भर पडली आहे. या खेळाला त्याच्या चिकित्सकांकडून चांगला प्रतिसाद लाभला आहे. १५ ऑगस्त २०१३ रोजी या खेळाची दुसरी आवृत्ती प्लांट्स व्हर्सेस झोम्बीज २: इट्स अबाउट टाइम ही आयओएससाठी प्रकाशित झाली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →प्लांट्स व्हर्सेस झोम्बीज
या विषयातील रहस्ये उलगडा.