फुटबॉल हा जगातील सर्वांत लोकप्रिय खेळ आहे. फुटबॉलच्या संघात ११ खेळाडू असतात. हा मैदानी खेळ मुख्यतः हिरवळ असलेल्या मैदानात खेळला जातो. मैदानाच्या दोन टोकांना उभारलेल्या गोलजाळ्यात चेंडू पोहोचवणे असे या खेळातील खेळाडूंचे उद्दिष्ट असते. गोलरक्षक वगळता इतर दहा खेळाडूंनी चेंडूला हात लावणे नियमबाह्य मानले जाते. जो संघ अधिक वेळा गोलजाळ्यात चेंडू टाकेल (गोल करेल) तो संघ विजेता ठरतो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →फुटबॉल
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.