सिड मायर्स सिव्हलिजेशन ५ (इंग्लिश: Sid Meier's Civilization V; सिड मायर्सचे सभ्यता ५) (थोडक्यात सिव्हलिजेशन ५ व सिव ५) हा एक २०१० साली प्रकाशित केलेला संगणक खेळ आहे. ह्याचे विकसन फिरॅक्सिस गेम्स ह्यांने केलेले असून प्रकाशन टूके गेम्स ह्यांने केले. सप्टेंबर २०११ला मायक्रोसॉफ्ट विंडोजवर व नोव्हेंबर २३, २०१०ला मॅक ओ.एस एक्सवर हा खेळ प्रकाशित करण्यात आला. सिड माइअर्स सिव्हलिजेशन या प्रसिद्ध खेळ मालिकेतील ही अगदी अलीकडची आवृत्ती आहे.
सिव्हलिजेशन ५ मध्ये खेळाडू एका ऐतिहासिक सभ्यतेला नियंत्रित करून व तिला भविष्यात नेऊन जिंकण्याचा प्रयत्न करतात. जिंकण्याचे विविध मार्ग खेळाडूंसमोर उपलब्ध असतात व ते मिळवण्यासाठी खेळाडू संशोधन, आंतरराष्ट्रीय नीती, विस्तार, आर्थिक विकास, शासनसंस्था व लष्करी विजयावर नियंत्रण जमवतात. हा खेळ एका अतिशय नवीन खेळ इंजिनवर बसवला आहे व मालिकेच्या आधल्या खेळांमधील चौकोनी फरश्यांऐवजी षटकोनी फरश्या वापरल्या आहेत. सिव्हलिजेशन ४ मधल्या अनेक गोष्टी बदलल्या किंवा पूर्णपणे काढून टाकल्या आहेत. उदाहरणार्थ धर्म व हेरगिरी. लढाई प्रणालीचे पूर्णपणे नूतनीकरण करण्यात आले आहे, त्यामुळे आता लष्करी सामग्रीची रास लावता येत नाही व शहरे आता स्वसंरक्षणासाठी शत्रूवर थेट हल्ला करू शकतात. तसेच, नकाशांवर आता संगणक-नियंत्रित नगरराज्य दिसून येतात, व त्यांच्याशी खेळाडू व्यापार, मुत्सद्देगिरी किंव्हा युद्ध करू शकतात. या स्वरूपात कोणत्याही संस्कृतीच्या सीमा एका वेळी एकाच फरशीने वाढतात. रस्ते राखण्यासाठी निर्वाह खर्च भरायला लागतो, त्यामुळे रस्त्यांची संख्या आता कमी झाले आहेत.
खेळात लोकसमूह, मॉडिंग व बहुखेळाडू हे वैशिष्ट्य समाविष्ट आहेत.
सिव्हीलायझेशन ५
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.