इंग्लंड

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

इंग्लंड

इंग्लंड युनायटेड किंग्डमचा एक घटकदेश आहे. युनायटेड किंग्डमची ८३% लोकसंख्या इंग्लंडमध्ये राहते; तर क्षेत्रफळानुसार इंग्लंड ग्रेट ब्रिटनचे दोन तृतीयांश क्षेत्रफळ व्यापतो. इंग्लंडच्या उत्तरेस स्कॉटलंड, पश्चिमेस वेल्स यांच्या भूसीमा असून इतर सर्व बाजूंनी उत्तर समुद्र, आयरिश समुद्र, केल्टिक समुद्र, ब्रिस्टल खाडी व इंग्लिश खाडी यांनी इंग्लंडला वेढले आहे. इंग्लंडची राजधानी असलेले लंडन ग्रेट ब्रिटनमधील सर्वात मोठे महानगर असून अनेक मानकांनुसार युरोपीय संघातील सर्वात मोठे नागरी क्षेत्र आहे.

इंग्लंडचे इ.स. ९२७ मध्ये एकत्रीकरण झाले त्या काळापासून आजवर इंग्लंड हा एकच असा देश आहे ज्याच्या सार्वभौमत्वाला कधीही तडे गेले नाहीत. इंग्लंड या देशाने आपल्या लष्करी सामर्थ्याच्या जोरावर संपूर्ण जगातील अनेक देशांवर राज्य केले, वसाहती स्थापन केल्या. या वसाहती विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत इंग्लंडच्या ताब्यात होत्या. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी त्यांनी राज्य केले त्या त्या भागावर त्यांनी कधीही न पुसता येणारा ठसा उमटवला. आज जगातील बहुतेक देशांमधील कायदे, लष्करी रचना, शिक्षण पद्धति, शास्त्रीय पद्धति, संसदीय लोकशाही व सरकार रचना यांत आजही इंग्रजी पद्धतिीचा प्रचंड प्रभाव दिसून येतो. इंग्रजांनी त्यांची इंग्लिश भाषा भाषा जगभरात नेल्यामुळे आज इंग्रजी ही अघोषितरित्या जगाची प्रमुख भाषा आहे. औद्योगिक क्रांतीचा आरंभ इंग्लंडमध्ये झाल्यामुळे इंग्लंडला औद्योगिक क्रांतीचे माहेरघर देखील म्हणतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →