दी एल्डर स्क्रोल्स ५: स्कायरिम

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

दी एल्डर स्क्रोल्स ५: स्कायरिम (इंग्लिश: The Elder Scrolls V: Skyrim; ज्येष्ठ गुंडाळ्या: स्कायरिम) (थोडक्यात स्कायरिम) हा एक २०११ साली प्रकाशित झालेला संगणक खेळ आहे. ह्याचे विकसन बेथेस्डा गेम स्टुडियोज ह्यांने केलेले असून ह्याचे प्रकाशन बेथेस्डा सॉफ्टवर्क्स ह्यांने केले. खेळाचे दिग्दर्शक टॉड हॉवर्ड व संगीतकार जेरमी सोउल. दी एल्डर स्क्रोल्स ह्या खेळांच्या मालिकेमधील हा पाचवा भाग असून हा नोव्हेंबर ११ २०११ला मायक्रोसॉफ्ट विंडोज, एक्स-बॉक्स ३६० व प्लेस्टेशन ३ यांसाठी प्रकाशित करण्यात आला.

स्कायरिमच्या मुख्य कथेत खेळाडू ऍल्डुइन नावाच्या एका ड्रॅगनला मारण्याचा प्रयास करतात. दी एल्डर स्क्रोल्स मधल्या इतर खेळांप्रमाणे हा खेळ निर्न या कल्पित ग्रहाच्या टॅम्रिएल भूखंडात स्थित असून त्यातल्या सर्वात उत्तरेला असणाऱ्या स्कायरिम प्रांतात बसवला आहे. दी एल्डर स्क्रोल्स मालिकेचे विख्यात वैशिष्ट्य, की खेळाडूंना मोकळ्या जगात कुठेही जाण्याचा स्वतंत्र असतो, या भागातसुद्धा दिसून येते. स्कायरिमची अनेक समीक्षकांनी कीर्ती करण्यात आली व ह्याचे प्रकाशित होण्याच्या पहिल्या ४८ तासांमध्येच ३५ लाख प्रत विकण्यात आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →