क्रिकेटमध्ये, फलंदाजी म्हणजे धावा काढण्यासाठी आणि स्वतःला बाद होण्यापासून वाचविण्यासाठी बॅटने चेंडू टोलावण्याची क्रिया किंवा कौशल्य आहे. सप्टेंबर २०२१ पासून, फलंदाजी करणारा कोणताही खेळाडू, फलंदाजी हे त्यांचे विशिष्ट क्षेत्र आहे की नाही याची पर्वा न करता अधिकृतपणे फलंदाज (batter) म्हणून संबोधित केला जातो. ऐतिहासिकदृष्ट्या, बॅट्समन आणि बॅट्सवुमनचा वापर केला जात होता आणि या संज्ञा मोठ्या प्रमाणावर वापरल्या जातात. वेगवेगळ्या क्रिकेट खेळपट्ट्यांवर, विशेषतः वेगवेगळ्या देशांमध्ये खेळताना फलंदाजांना विविध परिस्थितींशी जुळवून घ्यावे लागते; म्हणून, उत्कृष्ट शारीरिक फलंदाजी कौशल्ये असण्याबरोबरच, उच्च-स्तरीय फलंदाजांमध्ये जलद प्रतिक्षेप, उत्कृष्ट निर्णय घेण्याची क्षमता आणि उत्तम रणनीतीकार असणे गरजेचे असते.
एका डावा दरम्यान कोणत्याही वेळी फलंदाजी करणाऱ्या दोन सदस्य खेळपट्टीवर असतात. गोलंदाजाकडून चेंडूला सामोरे जाणाऱ्याला स्ट्रायकर म्हणतात, तर दुसऱ्याला नॉन-स्ट्रायकर म्हणतात. जेव्हा एखादा फलंदाज बाद होतो तेव्हा त्यांची जागा संघातील दुसरा फलंदाज घेतो. हे डावाच्या शेवटपर्यंत चालू राहते. बहुतेकदा डावाचा शेवट हा संघातील सर्वच्या सर्व १० फलंदाज बाद झाल्यावर होतो आणि तेव्हा दुसऱ्या संघाला फलंदाजीची संधी मिळते.
खेळल्या जाणाऱ्या सामन्याच्या प्रकारानुसार तसेच खेळाच्या सद्यस्थितीनुसार फलंदाजीचे डावपेच आणि रणनीती बदलते. फलंदाजांसाठी महत्त्वाचे असते ते बाद न होता आणि शक्य तितक्या लवकर धावा करणे. ही उद्दिष्टे सामान्यत: विरोधाभासी ठरतात - त्वरीत धावा करण्यासाठी, धोकादायक फटके किंवा शॉट्स खेळले जाणे आवश्यक आहे, ज्यामुळे फलंदाज बाद होण्याची शक्यता वाढते, तर सुरक्षित राहण्यासाठी सावध बचावात्मक फटके खेळणे आणि कोणत्याही धावांचा प्रयत्न न करणे ह्या पर्यायांची निवड फलंदाज करू शकतो. परिस्थितीनुसार, फलंदाज त्यांची विकेट टिकवण्यासाठी धावा काढण्याचे प्रयत्न सोडून देऊ शकतात किंवा बाद होण्याच्या शक्यतेच्या चिंतेने शक्य तितक्या लवकर धावा काढण्याचा प्रयत्न करू शकतात. इतर विविध बॅट आणि बॉल खेळांच्या विपरीत, क्रिकेटचे फलंदाज धावा काढण्यासाठी चेंडू कोणत्याही दिशेने मारू शकतात आणि तसे करण्यासाठी ते सर्जनशील शॉट्स वापरू शकतात.
इतर सर्व क्रिकेट आकडेवारीप्रमाणे, फलंदाजीच्या आकडेवारी आणि विक्रमांवर जास्त लक्ष ठेवले जाते आणि ते खेळाडूच्या परिणामकारकतेचे मोजमाप देतात. फलंदाजीची मुख्य आकडेवारी ही खेळाडूची फलंदाजीची सरासरी असते. फलंदाजीची सरासरी ही त्यांनी केलेल्या धावांच्या संख्येला, (खेळलेल्या डावांच्या संख्येने नव्हे तर) ते किती वेळा बाद झाले ह्या संख्येला भागून हे मोजली जाते.
डॉन ब्रॅडमन हे क्रिकेटमधील सर्वकालीन सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून ओळखले जातात आणि त्यांनी १९३० आणि १९४० च्या दशकात आपल्या कारकिर्दीत अनेक फलंदाजी विक्रम केले जे आजवर अबाधित राहिले आहेत. त्याने कारकिर्दीत ९९.९४ इतकी कसोटी सरासरी गाठली जी इतर कोणत्याही फलंदाजापेक्षा ३८ ने जास्त आहे. सचिन तेंडुलकरने खेळाच्या तीनही प्रकारांमध्ये मिळून १०० आंतरराष्ट्रीय शतके झळकावणारा पहिला खेळाडू आहे. त्याशिवाय आधुनिक काळातील अनेक फलंदाजी विक्रम त्याने प्रस्थापित केले आहेत. प्रथम श्रेणी सामन्यात (नाबाद ५०१) आणि कसोटी डावात नाबाद ४०० धावा करण्याचा विक्रम ब्रायन लाराच्या नावावर आहे. मिताली राज ही महिला क्रिकेटमधील सर्वकालीन महान फलंदाज म्हणून ओळखली जाते. तिने आधुनिक काळातील अनेक विक्रम प्रस्थापित केले, ज्यात महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आहे
फलंदाजी
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.