प्रोग्रेसिव्ह फील्ड

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

प्रोग्रेसिव्ह फील्ड

प्रोग्रेसिव्ह फील्ड हे अमेरिकेच्या ओहायो राज्यातील क्लीव्हलँड शहरात असलेले बेसबॉल मैदान आहे. हे मेजर लीग बेसबॉलच्या क्लीव्हलँड गार्डियन्सचे (पूर्वीचे क्लीव्हलँड इंडियन्स) घरचे मैदान आहे.

या मैदानाची बांधणी १९९४मध्ये झाली. त्यावेळी याचे नाव जेकब्स फील्ड होते. २००८मध्ये प्रोग्रेसिव्ह कॉर्पोरेशनने ५ कोटी ८० लाख डॉलर देउन या मैदानाला आपले नाव दिले. पूर्वीच्या नावावरून आजही हे मैदान द जेक टोपणनावाने ओळखले जाते. मैदानाच्या उद्घाटनाच्यावेळी याची प्रेक्षकक्षमता ४२,८६५ होती. २०२३मध्ये ही क्षमा ३४,८३० आहे परंतु अनेकदा उभ्याने सामने पाहण्यासाठीही प्रेक्षक आत सोडले जातात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →