२००८चा फॉर्म्युला वन हंगाम हा फॉर्म्युला वन अजिंक्यपदाचा ५९वा हंगाम होता. या हंगामाची सुरुवात मार्च १६ रोजी झाली व नोव्हेंबर २ला शेवट झाली. या हंगामात एकुन १८ शर्यती घेण्यात आल्या.
लुइस हॅमिल्टनला २००८ चे चालक अजिंक्यपद ऐका गुणावरून मिळाले. त्याने शेवटच्या शर्यतीत टिमो ग्लोकला शेवटच्या कोपऱ्यात गाठुन मागे टाकले. त्यामुळे त्या शर्यतीत त्याला ५वे स्थान मिळाले, व फिलिपे मास्साचे ५वे स्थान गेले. २००७वा फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद जिंकणारा किमी रायकोन्नेन, २००८ फॉर्म्युला वन अजिंक्यपदी तिसऱ्या स्थानात आला. त्याने या हंगामात दोन शर्यती जिंकल्या होत्या. स्कुदेरिआ फेरारीला २००८ चे कारनिर्माता अजिंक्यपद मिळाले.लुइस हॅमिल्टनहा सर्वात लहान वयात अजिंक्यपद जिंकणारा या पदवीच्या मानकरी झाला व डेमन हिल नंतर ग्रेट ब्रिटनसाठी अजिंक्यपद जिंकणारा तो एकमेव चालक ठरला. डेमन हिल ने ग्रेट ब्रिटनसाठी १९९६ फॉर्म्युला वन हंगामात अजिंक्यपद मिळावले होते.
एकुन अकरा कारनिर्मात्या संघांनी या अजिंक्यपदासाठी भाग घेतला. सुपर आगुरी एफ१ संघाने मे ६ रोजी या हंगामातुन माघार घेतली, त्यांची आर्थिक स्थिती बिघडल्यामुळे त्यांना फक्त ४ शर्यती पूर्ण करून माघार घ्यावी लागली. २००८चा फॉर्म्युला वन हंगामात काही नवीन कायदे सुद्धा अमलात आणण्यात आले, जसे ट्रॅक्शन कंट्रोल, लाँच कंट्रोल व इंजिन ब्रेकींग रिड्कशन या इलेक्ट्रॉनिक यंत्रांवर प्रतिबंध. २००१चा फॉर्म्युला वन हंगामात त्यांच्यावरील प्रतिबंध हटवण्यात आले होते.
२००८ फॉर्म्युला वन हंगामात दोन नवीन सर्किटांचा समावेश झाला, त्यात वेलेंशिया स्ट्रीट सर्किट व मरीना बे स्ट्रीट सर्किटचा समावेश आहे. वेलेंशिया स्ट्रीट सर्किट येथे युरोपियन ग्रांप्री आयोजीत झाली व मरीना बे स्ट्रीट सर्किट येथे सिंगापूर ग्रांप्री आयोजीत करण्यात आली. सिंगापूर ग्रांप्री ही फॉर्म्युला वन इतीहासातील पहिली रात्री चालणारी शर्यत होती. होंडा रेसिंग एफ१ कार्निर्मात्या संघाने त्यांची आर्थिक स्थिती बिघडल्यामुळे फॉर्म्युला वन मधुन माघार घेतली. नंतर रॉस ब्रानने हा संघ विकत घेतला, व नवीन संघाचे नाव ब्रॉन जीपी म्हणून ठेवले. ब्रॉन जीपी कार्निर्माता संघने त्यांच्या गाड्यांसाठी मर्सिडिज-बेंझ इंजिनांचा वापर केला. २००८ फॉर्म्युला वन हंगाम हा शेवटचा हंगाम होता जेथे खाचे असलेले टायर वापरले गेले. खाचे असलेले टायर वापरण्याच्या प्रथेची सुरुवात १९९८ फॉर्म्युला वन हंगामापासुन झाली होती. २००९ फॉर्म्युला वन हंगामापासुन गुळगुळीत टायर वापरण्याच्या प्रथेची सुरुवात झाली.
फॉर्म्युला वनच्या इतिहासात पहिल्यांदा असे झाले की सर्व संघानी त्यांच्या दोघ्या चालकांचा वापर पूर्ण हंगामात केला, व पहील्यांदा ट्रॅक्शन कंट्रोलच्या बिना गाड्या चालवण्यात आल्या होत्या.
२००८ फॉर्म्युला वन हंगाम
या विषयातील रहस्ये उलगडा.