प्राण किशोर कौल (जन्म २३ जानेवारी १९२५, श्रीनगर) हे काश्मिरी रंगमंचावरील व्यक्तिमत्त्व आहे. अभिनयाबरोबरच त्यांनी पटकथा, दिग्दर्शिन आणि लेखनही केले आहे.
त्यांचे प्राथमिक शिक्षण श्रीनगर येथे झाले व नंतर लाहोरच्या पंजाब विद्यापीठात झाले. १९४३ मध्ये श्रीनगरच्या एस.पी. कॉलेजमधून नाटकांमध्ये भाग घेतला.
१९८९ मध्ये शीन तू वाटू पॉड या कादंबरीसाठी त्यांना काश्मिरीतील साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. काश्मिरी आणि भारतीय कलांना समर्थन देण्याच्या ध्येयाने मोठ्या प्रमाणावर प्रवास करणाऱ्या मिलत्सार काश्मीर संगीत आणि नृत्य गटाच्या संस्थापकांपैकी ते एक होते. ते १९९१ च्या दूरदर्शन टेलिव्हिजन मालिका गुल गुलशन गुलफाम याचे निर्माता म्हणून ओळखले जातात. २०१८ मध्ये कौल यांना पद्मश्री नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २०२४ मध्ये त्यांना साहित्य अकादमी फेलोशिप मिळाली.
प्राण किशोर कौल
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!