मेहविश मुश्ताक हकक (उर्दू : مہوش مشتاق) (जन्म: १९८९) या एक मोबाईल ॲप आणि संगणकाची आज्ञावली विकसक (सॉफ्टवेअर डेव्हलपर) आहेत. त्यांनी २०१३ मध्ये काश्मीर खोऱ्यासाठी "डायल काश्मीर" नावाचे व्यावसायिक निर्देशिका (बिझनेस डिरेक्टरी) ॲप तयार केले, ज्यामुळे मोबाईल ॲप विकसित करणारी पहिली काश्मिरी महिला असा त्यांना बहुमान लाभला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मेहविश मुश्ताक
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.