मणि कौल (२५ डिसेंबर १९४४ - ६ जुलै २०११) हे हिंदी चित्रपटांचे भारतीय दिग्दर्शक आणि समांतर चित्रपटसृष्टीतील एक व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफडिआयआय) मधून पदवी प्राप्त केली जिथे ते ऋत्विक घटक यांचे विद्यार्थी होते आणि नंतर तिथे शिक्षक बनले. उस्की रोटी (१९६९) या चित्रपटाने त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात केली, ज्याने त्यांना सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा फिल्मफेर समीक्षक पुरस्कार मिळवून दिला, व त्यांनी एकूण चार पुरस्कार जिंकले. १९७४ मध्ये त्यांना दुविधासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि नंतर १९८९ मध्ये त्यांच्या सिद्धेश्वरी माहितीपटासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.
कर्करोगाशी दीर्घकाळ झुंज दिल्यानंतर मणि कौल यांचे ६ जुलै २०११ रोजी दिल्लीजवळील गुडगाव येथील त्यांच्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले आणि दोन मुली आहेत.
मणि कौल
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.