आषाढ का एक दिन हा मोहन राकेश यांच्या त्याच नावाच्या नाटकावर आधारित १९७१ चा हिंदी चित्रपट आहे. हा चित्रपट मणि कौल यांनी दिग्दर्शित केला होता ज्यात रेखा सबनीस, अरुण खोपकर आणि ओम शिवपुरी यांनी भूमिका केल्या होत्या.
चित्रपटाची कथा संस्कृत कवी कालिदास, मल्लिका आणि प्रियांगमंजरी यांच्यातील प्रेम त्रिकोणावर केंद्रित आहे.
या चित्रपटाला भारतातील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा फिल्मफेर समीक्षक पुरस्कार मिळाला.
आषाढ का एक दिन (चित्रपट)
या विषयातील रहस्ये उलगडा.