प्रवीण दाटके

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

प्रवीण प्रभाकरराव दाटके (१६ डिसेंबर, १९७८:नागपूर, महाराष्ट्र, भारत - ) हे मराठी राजकारणी आहेत. हे २०२४ च्या विधानसभा निवडणुकांत नागपूर मध्य मतदारसंघातून भाजपतर्फे महाराष्ट्राच्या १५व्या विधानसभेवर निवडून गेले. याआधी हे भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि नागपूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि माजी महापौर होते. २००४ मध्ये वयाच्या २५ व्या वर्षी दाटके महाल वॉर्डमधून नगरसेवक म्हणून निवडून आले. दोन मुदतींनंतर ते नंतर नागपूर महानगरपालिकेचे महापौर झाले.

या निवडणुकीआधी दाटके १४ मे २०२० रोजी आमदारांच्या मतांनी विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आले

दाटके यांचे वडील शिक्षक सहकारी बँक लिमिटेडचे संस्थापक प्रभाकरराव दटके होत.

प्रवीण दाटके हे नागपूरच्या महाल भागातील नवयुग माध्यमिक विद्यालय येथून १०वी पास आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →