प्रमुख राज्य महामार्ग १ हा महाराष्ट्र राज्यातील एक प्रमुख राजकीय महामार्ग आहे. हा राजकीय महामार्ग धुळे जिल्ह्यातील सोनगिर गावाला, नंदुरबार जिल्ह्यातील वाडीफाली गावातसोबत जोडतो व धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातुन जातो. हा राजकीय महामार्ग सोनगिर, चिमठाणे, दोंडाईचा, सारंगखेडा, निमगुळ, शहादा, धडगाव, काठी, मोल्गी आणि वाडीफाली ह्या गावांना अथवा शहरांना जोडतो. वाडीफाली गावानंतर हा महामार्ग महाराष्ट्र-गुजरात सिमा ओलांडुन गुजरात राज्यातील, नर्मदा जिल्यात शिरतो व धुमखाळ गावमध्ये संपतो. धुमखाळ गाव हे सरदार सरोवर धरणापासुन नैऋत्य (दक्षिण-पश्चिम) दिशेला १५ कि.मि. अंतरावर आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →प्रमुख राज्य महामार्ग १ (महाराष्ट्र)
थोडक्यात पण महत्त्वाचे.