प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना (इं:Pradhan Mantri Krishi Sinchai Yojana, लघुरुप: (PMKSY))हे एक राष्ट्रीय ध्येय आहे. याचा उद्देश शेतकी उत्पादन वाढविणे व देशातील विविध स्रोतांचा वापर होतो आहे याची खात्री करणे असा आहे.येत्या ५ वर्षात याची अंदाजपत्रकीय तरतूद रु. ५०,००० करोड इतकी आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी शासनाने २०१४-१५ च्या साधारण अर्थसंकल्पात निश्चित सिंचन करण्याच्या उद्देशाने १००० कोटी रु खर्चून प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना सुरू करण्याची घोषणा केली ,परंतु त्या आर्थिक वर्षात ही योजना सुरू होऊ शकली नाही , २०१५-१६ च्या अर्थसंकल्पात सूक्ष्मसिंचन ,पाणलोट क्षेत्रविकास आणि प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना यासाठी ५,३०० कोटी रु. तरतूद करण्यात आली १ जुलै २०१५ला केंद्रीय मंत्रिमंडळाने या मसुद्यास मंजूरी दिली .याचे प्रमुख नरेंद्र मोदी होते.
ध्येय -: प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेचे प्रमुख ध्येय हे 'प्रत्येक शेतापर्यंत पाणी 'पोहचविणे हे आहे , ज्या पद्धतीने प्रधानमंत्री ग्रामसडक योजन प्रत्येक खेड्यापर्यंत रस्ते पोहचविण्याचे उद्दिष्ट ठेवते ,त्याचपद्धतीने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना प्रत्येक शेतापर्यंत सिंचन पोहचविण्याचे उद्दिष्ट ठेवते या योजनेचे ध्येय शेत ते शेत सिंचनपुरवठा साखळी निर्माण करणे आहे.
कार्यपद्धत - प्रत्येक शेतापर्यंत पाणी पोहचविण्याचे ध्येय गाठण्यासाठी सलग एकच तत्त्व स्वीकारण्यापेक्षा तीन विविध तत्त्वे स्विकारण्यात आली आहेत , ती म्हणजे जलस्रोतांचा विकास ,जलवितरण आणि जलनियोजन ,या तीन तत्त्वांशी संबधीत सध्याच्या योजना या प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेच्या सहयोजना असतील .
प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना
यामागील विज्ञान आणि इतिहास.