माझी कन्या भाग्यश्री योजना

यामागील विज्ञान आणि इतिहास.

माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र | माझी कन्या भाग्यश्री योजना ऑनलाइन अर्ज | मुलींसाठी सरकारी योजना महाराष्ट्र | माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र ऑनलाइन अर्ज, फॉर्म PDF, पात्रता, योजनेचे लाभ | शासकीय अनुदान योजना

महाराष्ट्र सरकार राज्याच्या नागरिकांसाठी विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना आणि सेवा राबवीत असते, याच धोरणाला अनुसरून राज्यातील मुलींसाठी राज्य शासनाने माझी कन्या भाग्यश्री योजना सुरू केली, या योजनेच्या माध्यामतून महाराष्ट्र राज्यामध्ये मुलींचे शक्षण व आरोग्य यांच्या मध्ये सुधारणा करणे मुलींच्या भविष्यासाठी आर्थिक व्यवस्था करणे, याचबरोबर समाजामध्ये मुलींच्या जन्मा विषयीचे नकारत्मक विचारांमध्ये सुधारणा करून मुलींच्या विषयी सकारात्मक विचार निर्माण करणे तसेच बाल विवाह रोखणे आणि मुला इतकाच मुलींचा जन्म दर वाढविणे हा उद्देश समोर ठेवून महाराष्ट्र शासनाने राज्यात 2014 मध्ये सुकन्या योजना सुरू करण्यात आली आहे, सुकन्या योजनेचा लाभ 1 जानेवारी 2014 पासून जन्मणाऱ्या मुलींना करिता लागू आहेत.

याच प्रमाणे केंद्र सरकारने ‘बेटी बचाओ बेटी पढ़ाओ’ ही योजना फेब्रुवारी 2014 पासून सुरू केली आहे, ज्या जिल्ह्यांमध्ये मुलींचे प्रमाण कमी आहे अशा जिल्ह्यांमध्ये ही योजना लागू करण्यात आली आहे. सदर योजनेसाठी भारतातील शंभर जिल्ह्यांची निवड करण्यात आली होती, यानंतर सुकन्या योजनेचे लाभ कायम ठेवून माझी कन्या भाग्यश्री योजना सुधारित ही योजना दिनांक 1 ऑगस्ट 2017 पासून सुरू करण्यात आली. वाचक मित्रहो या लेखामध्ये माझी कन्या भाग्यश्री योजनेबद्दल संपूर्ण माहिती देत आहोत, यामध्ये या योजनेचे उद्दिष्ट काय आहे, शासनाचा निर्णय, पात्रता, अर्ज करण्याची पद्धत आणि योजनेचा लाभ मिळविण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे इत्यादी माहित आपण या लाखामध्ये पाहणार आहोत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →