प्रधानमंत्री मुद्रा योजना

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

प्रधानमंत्री मुद्रा योजना

प्रधानमंत्री मुद्रा योजना (इं:Pradhan Mantri Mudra Yojana लघ्रुप:(PMMY))२०१५ -१६ च्या अर्थसंकल्पानुसार २०००० कोटी रुपयांची गुंतवणूक करून मुद्रा बँक उभारण्याची घोषणा करण्यात आली , बँकेअंतर्गत ३००० कोटी रुपयांचा पतहमी निधी उभारण्याची घोषणा करण्यात आली . मुद्रा बँकेची कंपनी म्हणून मार्च २०१५ मध्ये कंपनी कायदा २०१३ अंतर्गत आणि गैरबँकिंग वित्तीय कंपनी म्हणून ७ एप्रिल २०१५ला रिझर्व्ह बँक कायदा १९३४ अंतर्गत नोंदणी करण्यात आली मुद्रा ही एक सुक्ष्म एककांच्या विकास व पुनर्वित्तपुरवठ्यासाठी भारत सरकारने स्थापित केलेली नवीन संस्था आहे.या योजनेची घोषणा, २०१६ च्या केंद्रीय अंदाजपत्रकामध्ये अर्थमंत्र्यांनी केली. या मुद्रा योजनेचा उद्देश {नॉन-कॉर्पोरेट} नवीन सामुदायिक लघु व्यावसायिक क्षेत्रास वित्त पुरवठा करणे असा आहे.

प्रधानमंत्री मुद्रा योजनेत रु. एक लाख करोड पर्यंत छोट्या व्यावसायिकांना कर्ज मंजूर करण्यात आले असे प्रधानमंत्री म्हणाले.त्यांनी यावर जोर दिला कि तरुणांनी रोजगार देण्याची तयारी ठेवावयास हवी न कि रोजगार मागण्याची.



या योजनेच्या लाभार्थ्यांना भरावा लागणारा व्याजाचा दर हा सुमारे 8.40% ते 12.45% एवढा आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →