प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजना
अल्प व अत्यल्प जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र शासनाने सुरू केलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना महाराष्ट्र राज्यात ०१/१२/२०१८ पासून राबवण्यास सुरुवात झाली.[१]
२ हेक्टर पर्यत शेती असणाऱ्या कुटुंबाला प्रती हप्ता रुपये २००० म्हणजेच वार्षिक ६००० अर्थसाह्य दिले जाते.
या योजनेत पुढे केंद्र सरकारने बदल करून सरसकट सर्वांना या योजनेचा लाभ देण्याचे आदेश देण्यात आले. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेंतर्गत केंद्र शासनाने निकष शिथिल केल्याने लाभार्थी शेतकरी कुटुंबांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. शेतकरी कुटुंबासाठी दोन हेक्टरची मर्यादा रद्द केल्याने सरसकट शेतकरी कुटुंबे योजनेसाठी पात्र ठरली आहेत.
[२] अट शिथिल केल्यामुळे राज्यातील सव्वा कोटी शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!