प्रणिती शिंदे

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

प्रणिती सुशीलकुमार शिंदे या एक भारतीय राजकारणी आहेत. महाराष्ट्र विधानसभेत त्या सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा निवडून आलेल्या आहेत. त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सदस्य आहेत आणि २०२१ पासून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या कार्यकारी अध्यक्ष देखील आहेत. तसेच त्या केरळ प्रदेश काँग्रेस समितीच्या विधानसभा निवडणुकीसाठीच्या स्क्रिनिंग समितीच्या सदस्य देखील आहेत.

त्याच बरोबर त्या 2024 ला खासदार झाल्या आहेत.

प्रणिती शिंदे या माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आहेत. त्या एक सामाजिक कार्यकर्त्या असून 'जाई जुई' या त्यांच्या अशासकीय संस्थेद्वारे काम करत असतात. शिंदे यांनी मुंबईच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →