प्यार तूने क्या किया ही एक भारतीय टेलिव्हिजन नाट्य मालिका आहे, जी पहिल्यांदा २३ मे २०१४ रोजी झिंगवर प्रदर्शित झाली. २०१४ ते २०२३ ह्याचे १३ सत्रा प्रदर्शित झाले आहे.
सीझन १-४ चे सूत्रसंचालन सुरभी ज्योती, पार्थ समथान आणि मयांग चांग यांनी केले होते. सीझन ५ चे सूत्रसंचालन स्मृती कालरा, सीझन ६ चे सूत्रसंचालन करण कुंद्रा, सीझन ७ चे सूत्रसंचालन सिद्धार्थ गुप्ता आणि नीति टेलर, सीझन ८ चे सूत्रसंचालन अर्जित तनेजा, अभिषेक मल्लिक आणि शालीन मल्होत्रा आणि सीझन ९ चे सूत्रसंचालन प्रिन्स नरुला यांनी केले होते. मालिकेचे शीर्षक गीत जुबिन नौटियाल यांनी गायले आहे.
ही मालिका भारतीय तरुणांच्या जीवनातून प्रेरित वेगवेगळ्या प्रेमकथा सादर करते. या मालिकेत तरुणांच्या दुःखद प्रेमकथा सांगितल्या आहेत आणि आजचे जोडपे प्रेमाची भावना आणि जीवनात घेतलेले निर्णय समजून घेण्यासाठी विविध आव्हानात्मक परिस्थिती, गुंतागुंत आणि गोंधळाचा सामना कसा करतात हे दाखवले आहे. प्रत्येक भागात तरुणांनी त्यांच्या प्रेम जीवनात केलेल्या चुकांवर प्रकाश टाकला आहे व एक सामाजिक संदेश देखील आहे.
प्यार तूने क्या किया (मालिका)
थोडक्यात पण महत्त्वाचे.