पौषमेळा

या विषयावर तज्ञ बना.

पौषमेळा

पौष मेळा (बंगाली : পৌষ মেলা) हा बंगाल राज्यातील शांतिनिकेतन येथील वार्षिक आनंदोत्सव आहे. यानिमित्त येथे जत्रेचे आयोजन केले जाते. सुगीच्या हंगामाचा आनंद घेणे हा या उत्सवाचा हेतू मानला जातो. बंगाली कालदर्शिकेनुसार पौष महिन्याच्या सातव्या दिवशी या उत्सवाची सुरुवात होते. शांतिनिकेतन विद्यापीठात या निमित्ताने बंगाली लोक संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या बाऊल, काव्यवाचन, नृत्य अशा कलांचे सादरीकरण आयोजित केले जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →