पोहरादेवी हे भारतातील महाराष्ट्र राज्याच्या वाशीम जिल्ह्यातील एक गाव आहे. या ठिकाणी जगद्गुरू संत सेवालाल महाराज तसेच माता जगदंबा देवीचे भव्य मंदिर आहे. श्रीक्षेत्र पोहरादेवी हे ठिकाण बंजारा समाजाची काशी म्हणून प्रसिद्ध आहे.
तसेच पोहरादेवी येथे धर्मगुरू संत रामराव महाराजांची देखील समाधी आहे.
पोहरादेवी पासून पश्चिमेकडे उमरीगड हे संत सामकी मातेचे जागृत मंदिर असून बहुजनाचे मातृतिर्थ मानले जाते.
पोहरादेवी हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध तिर्थक्षेत्रांपैकी एक आहे.
श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार तथा भारतीय कृषीक्रांतीचे प्रवर्तक वसंंतराव नाईक, जलसंधारणाचे जनक सुधाकरराव नाईक यांनीही भेटी दिलेली असून त्यांची समाधी पोहरादेवी पासून काही अंतरावर गहुलीगड येथे आहे.
जवळचे रेल्वे स्थानक मुर्तीजापूर, अकोला व वाशिम आहे. अमरावती ८७ किमी आहे. अकोला, मंगरुळपीर शहरांमधून (दिग्रस व मानोरा) पोहरादेवी यथे जाण्यासाठी एस.टी. बसेस आणि खाजगी वाहने मिळतात.
पोहरादेवीपासून वाशीम ५१ किलोमीटरवर, यवतमाळ ७१ कि.मी.वर आणि हिंगोली ७७ कि.मी.वर आहे.
रामनवमीला दरवर्षी येथे भव्य यात्रा भरते.
पोहरादेवी
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.