सेवालाल महाराज

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

सेवालाल महाराज

क्रांतिसिंह सेवालाल महाराज (१५ फेब्रुवारी १७३९ - ४ जानेवारी १७७३ ) हे भारतीय समाजसुधारक होते. 'गोरराजवंशी बंजारा' समाजातील प्रख्यात सतगुरू होते. क्रांतिसिंह सेवालाल महाराज यांचा जन्म १५ फेब्रुवारी १७३९ रोजी आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील गुट्टी तालुक्यातील गोलाल डोडी गावात झाला. आता ते गाव सेवागड या नावाने ओळखले जाते.

सेवालाल महाराज हे एक भारतीय सामाजिक-धार्मिक

क्षेत्रातील एक सुधारक होते. संत हाथीराम बाबा, बाबा लखीशाह बंजारा, संत रूपसिंह महाराज, क्रांतिकारी संत गोविंद गुरू बंजारा यासह हा शुरवीर गोरराजवंशी बंजारा समुदाय संत सेवालाल महाराजांना आपले आध्यात्मिक गुरू म्हणून मानतात. ते जगदंबेचे परम शिष्य होते. आयुष्यभर ब्रह्मचारी राहिले. रामावत क्षत्रिय कुळातील भीमासिंह नाईक यांचे ते चिरंजीव होते. विदर्भात संत श्री सेवालाल महाराज यांची सत्ता राहिलेली आहे. बंजारा साम्राज्य म्हणून विदर्भातील सर्व जनतेला त्यांनी बंजारा साम्राज्यात सामील करून घेतले. त्यामुळेच विदर्भात राहणारा प्रत्येक व्यक्ती हा बंजारा साम्राज्याच्या अधिपत्याखाली राहिलेला आहे. राजमाता जिजाबाई ह्या देखील बंजारा साम्राज्याचा भाग असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील होत्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →