पैगाम

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

पैगाम हा १९५९ मध्ये एस.एस. वासन दिग्दर्शित केलेला हिंदी भाषेतील नाट्य चित्रपट आहे. या चित्रपटात दिलीप कुमार, वैजयंतीमालांच्या प्रमुख भूमिका आहेत, तर राज कुमार, पंडारी बाई, बी. सरोजा देवी, मोतीलाल आणि जॉनी वॉकर हे इतर महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. चित्रपटाचे संगीत सी. रामचंद्र यांनी दिले होते. दिलीप कुमार आणि राज कुमार पहिल्यांदाच एका चित्रपटात एकत्र दिसले. नंतर तीन दशकांनंतर १९९१ मध्ये आलेल्या सौदागर या चित्रपटात ते पुन्हा एकदा एकत्र दिसले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर म्हणून घोषित झाला.

या चित्रपटाचा नंतर तमिळमध्ये इरुम्बू थिराई या नावाने वासन यांनी रिमेक केला, ज्यामध्ये वैजयंतीमाला आणि सरोजा देवी यांनी त्यांच्या भूमिका पुन्हा केल्या.

७ व्या फिल्मफेर पुरस्कारांमध्ये, रामानंद सागर यांना सर्वोत्कृष्ट संवादासाठी फिल्मफेर पुरस्कार मिळाला, राज कुमार यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्यासाठी नामांकन मिळाले आणि दिलीप कुमार यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी नामांकन मिळाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →