पेद्दपल्ली हा भारताच्या तेलंगणा राज्यामधील एक जिल्हा आहे. २०१६ साली करीमनगर जिल्याचे विभाजन करून ह्या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. पेद्दापल्ली जिल्हा तेलगंणाच्या उत्तर भागात स्थित आहे. पेद्दपल्ली येथे ह्या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे.
रामगुंडम शहर हे शैक्षणिक आणि औद्योगिक केंद्र आहे. रामागुंडम शहर बहुसांस्कृतिक आणि भाषिक विविधतेसाठी प्रसिद्ध आहे. पेड्डापल्ली शहर हे एक शैक्षणिक केंद्र देखील आहे आणि मुख्यतः शेती व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे. रामागुंडम हे या जिल्ह्यातील फक्त सर्वात मोठे शहर आहे आणि तेलंगणा राज्यातील ५ वे सर्वात मोठे शहर आहे. एनटीपीसी रामगुंडम हा भारतामधील सर्वात मोठा औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प ह्याच जिल्ह्यामध्ये आहे.
पेद्दपल्ली जिल्हा
या विषयातील रहस्ये उलगडा.