पेट्रोलियम उद्योग

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

पेट्रोलियम उद्योग

पेट्रोलियम उद्योग, ज्याला तेल उद्योग म्हणूनही ओळखले जाते, हा जागतिक स्तरावर तेलचा शोध, उत्खनन, शुद्धीकरण, वाहतूक (बहुतेकदा तेल टँकर आणि पाइपलाइनद्वारे) आणि पेट्रोलियम उत्पादनांचे विपणन यासोबत निगडीत उद्योग आहे. या उद्योगातील सर्वात मोठी उत्पादने म्हणजे इंधन तेल आणि पेट्रोल आहे. पेट्रोलियम (खनिज तेल) हे पेट्रोकेमिकल, औषध, द्रावक, खते, कीटकनाशके, कृत्रिम सुगंध आणि प्लास्टिक यासह अनेक रासायनिक उत्पादनांसाठी कच्चा माल देखील आहे. हा उद्योग सहसा तीन प्रमुख घटकांमध्ये विभागला जातो: अपस्ट्रीम, मिडस्ट्रीम आणि डाउनस्ट्रीम. अपस्ट्रीममध्ये कच्च्या तेलाचा शोध आणि उत्खनन समाविष्ट आहे, मिडस्ट्रीममध्ये त्याची वाहतूक आणि साठवणूक समाविष्ट आहे आणि डाउनस्ट्रीममध्ये कच्च्या तेलाचे विविध अंतिम उत्पादनांमध्ये शुद्धीकरण करणे समाविष्ट आहे.

पेट्रोलियम हे अनेक उद्योगांसाठी महत्त्वाचे आहे आणि सध्याच्या परिस्थितीत औद्योगिक संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी ते आवश्यक आहे, ज्यामुळे ते अनेक राष्ट्रांसाठी एक गंभीर चिंतेचा विषय बनते. जगातील ऊर्जेच्या वापरात तेलाचा वाटा मोठा आहे, जो युरोप आणि आशियासाठी किमान ३२% पासून मध्य पूर्वे देशांसाठी ५३% पर्यंत आहे.

इतर भौगोलिक प्रदेशांचे वापराचे नमुने खालीलप्रमाणे आहेत: दक्षिण आणि मध्य अमेरिका (४४%), आफ्रिका (४१%) आणि उत्तर अमेरिका (४०%). जग ३६ अब्ज बॅरल (५.८किमी ३ ) एवढे तेल दरवर्षी वापरते. ज्यामध्ये विकसित राष्ट्रे सर्वात जास्त वापर करतात. २०१५ मध्ये उत्पादित झालेल्या तेलाच्या १८% तेलाचा वापर अमेरिकेने केला होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →