पेंटाला हरिकृष्ण (तेलुगु: పెంటల హరికృష్ణ; जन्म: १० मे १९८६) हा एक भारतीय बुद्धिबळ ग्रँडमास्टर आहे. २००० ते २०२४ पर्यंत त्यांनी अकरा बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. नोव्हेंबर २०१६ मध्ये त्याने क्र. १० चे सर्वोच्च मानांकन आणि डिसेंबर २०१६ मध्ये २७७६ चे सर्वोच्च एलो गुणांकन प्राप्त केले.
१७ ऑगस्ट २००१ रोजी, तो ग्रँडमास्टरची पदवी मिळवणारा सर्वात तरुण भारतीय ठरला. हा विक्रम नंतर कोनेरू हम्पी, परिमर्जन नेगी, आर प्रज्ञानंदा आणि गुकेश डोम्माराजू यांच्या नावावर होता.
२०१० मध्ये हरिकृष्णाने जागतिक सांघिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत संघाला कांस्यपदक जिंकवले. आशियाई सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत, हरिकृष्णाने त्याच्या संघांना सुवर्णपदक (२००९) आणि दोन रौप्यपदके (२००३ आणि २०१२) जिंकवले.
त्याने २०१२ मध्ये टाटा स्टील स्पर्धा 'ब' गट आणि २०१३ मध्ये बीएल एमटीओ मास्टर्स ओपन स्पर्धा जिंकली.
फेब्रुवारी २०१३ मध्ये, हरिकृष्णाने पहिल्यांदाच २७०० एलो गुणांकन मिळवले, असे करणारा तो तिसरा भारतीय खेळाडू बनला.
२०२३ मध्ये जागतिक महिला अजिंक्यपद स्पर्धेत हरीने जू वेनजुन हिचा सहाय्यक म्हणून काम केले, जेथे जू ने लेई टिंगजी विरुद्ध यशस्वीपणे आपले जगज्जेतेपद राखले.
हंगेरीतील बुडापेस्ट येथे झालेल्या २०२४ च्या बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये तो सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघाचा भाग होता.
बुद्धिबळ जगज्जेता गुकेश डोम्माराजू यानी खुलासा केला की हरिकृष्ण हा २०२४ च्या जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेसाठी त्याच्या सहाय्यक संघात सामील होता, जी गुकेशने डिंग लिरेनविरुद्ध जिंकली होती.
पेंटाला हरिकृष्ण
या विषयावर तज्ञ बना.