पूना ब्लाइंड स्कूल अँड होम

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

ही अंध विद्यार्थ्यांसाठी असलेली शाळा आहे. १९३४ साली, डॉक्टर मचवे यांनी पुण्यातील सोमवार पेठ येथे शाळेची स्थापना केली होती. त्यानंतर कोरेगाव पार्क येथे शाळा स्थलांतरित करण्यात आली. १९७४ साली संस्थतर्फे, अंध मुलींसाठी देखील स्वतंत्र शाळा सुरू करण्यात आली. व्यवसायाभिमुख प्रात्यक्षिक शिक्षणाव्यतिरिक्त अंध विद्यार्थ्यांच्या क्रीडा, कला कौशल्य विकासासाठी शाळेकडून प्रशिक्षण दिले जाते. शाळेतील अमोल खर्चे, या विद्यार्थ्याची भारतीय अंध क्रिकेट संघात निवड करण्यात आली होती. २०१९ साली सायली शितोळे या विद्यार्थिनीने अंध विद्यार्थ्यांसाठीच्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत पहिल्या १६ स्पर्धकांमध्ये स्थान मिळवले होते. रेणूका साळवे आणि सोनाली वाजगे या दोन विद्यार्थिनींनी अंधांसाठीच्या राष्ट्रीय ज्युडो स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवले आहे. तसेच दोघींची कॉमनवेल्थ स्पर्धेसाठीसुद्धा निवड झाली होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →