पूनम ढिल्लन

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

पूनम ढिल्लन

पूनम ढिल्लन (जन्म: १८ एप्रिल १९६२, कानपूर) ही एक भारतीय अभिनेत्री आणि राजकारणी आहे. ही १९७८ ची इव्हज वीकली मिस यंग इंडिया होती व ती तिच्या १९७९ च्या नूरी चित्रपटासाठी प्रसिद्ध आहे. रेड रोझ (१९८०), दर्द (१९८१), रोमांस (१९८३), सोहनी महिवाल (१९८४), तेरी मेहेरबानिया (१९८५), समुंदर (१९८६), सवेरेवाली गाडी (१९८६), कर्मा (१९८६), नाम (१९८६) आणि मालामाल (१९८८) हे तिचे काही गाजलेल्या चित्रपट आहे.

ढिल्लन २००९ मध्ये बिग बॉसमध्ये सहभागी झाली होता. तिने २०१३ मध्ये सोनी टीव्ही मालिका एक नई पहचानमध्ये शारदा मोदीची मुख्य भूमिका साकारली होती. तिने नाटकात काम केले आहे. पुरस्कारप्राप्त "द परफेक्ट हसबंड" आणि "द परफेक्ट वाइफ" व इतर अनेक नाटकांमध्ये तिने काम केले आहे ज्यांनी युनायटेड स्टेट्स आणि दुबईमध्ये अनेक प्रयोग केले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →