पुरुसेरे कत्तुना किंवा पुरुषमक्कल कुनीता हा कर्नाटक राज्यातील लोकसंस्कृती मधील नृत्य नाट्य कलाप्रकार आहे. यालाच असेही स्थानिक भाषेत सिद्धवेश/सिद्धवेस असेही म्हणले जाते. सुल्लिया, बेलथनगड्डी, पुत्तुर येथील तुळू गौडा समाजाचे सदस्य तुळु दिनदर्शिकेनुसार सुग्गी महिन्याच्या पौर्णिमेला हा उत्सव साजरा केला जातो. या उत्सवाचे स्वरूप सामाजिक आणि धार्मिक आहे. हा उत्सव संध्याकाळी सुरू होतो आणि पहाटेपर्यंत सुरू राहतो. यामध्ये समाजातील विविध स्तरातील लोकांच्या घरी भेट देणे आणि लोकनृत्य-नाट्य सादर करणे हे याचे स्वरूप आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पुरुसेरे कत्तुना
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.