नमन (लोककला)

या विषयातील रहस्ये उलगडा.

नमन ही कोकणातील एक पारंपरिक सांस्कृतिक लोकनाट्यप्रकार किंवा धार्मिक नृत्यनाट्य प्रकार आहे. मुख्यतः महाराष्ट्र राज्याच्या कोकणकिनारपट्टीतील सिंधुदुर्ग, रत्‍नागिरी आणि रायगड जिल्ह्यांमध्ये ही परंपरा विशेषतः प्रचलित आहे.

नमन हा प्रकार गावातील उत्सव, देवतेची जत्रा किंवा विशेष धार्मिक प्रसंग यामध्ये सादर केला जातो.

नमन हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून, ते धार्मिक विधी, सामुदायिक एकोपा आणि सांस्कृतिक वारसा जपणारे एक प्रभावी माध्यम आहे.

देवतेचे आवाहन, गावाचे कल्याण चिंतणे आणि समाजप्रबोधन, समाजाचे रंजन करणे हे नमनाचे प्रमुख उद्देश आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →