पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (संक्षेप: पी.एम.पी.एम.एल.) ही पुणे महानगरपालिकेची आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे. पुणे महानगर परिसराला बससेवा पुरवणाऱ्या ह्या संस्थेची स्थापना १९ ऑक्टोबर २००७ रोजी पुणे शहरामधील पुणे महानगर परिवहन (पुणे म्युनिसिपल ट्रान्सपोर्ट / PMT) व पिंपरी चिंचवड शहरामधील पिंपरी चिंचवड महानगर परिवहन (पिंपरी चिंचवड म्युनिसिपल ट्रान्सपोर्ट / PCMT) ह्या दोन परिवहन कंपन्यांच्या एकत्रीकरणामधून झाली.
पी.एम.पी.एम.एल.च्या १३००हून अधिक बसगाड्यांच्या दररोज सुमारे १९,००० फेऱ्या होतात.
सध्या पी.एम.पी.एम.एल.च्या बस सेवेचे ३६५ मार्ग व ३२७८ थांबे असून दररोज सुमारे ८ लाख प्रवासी ही सेवा वापरतात. पी.एम.पी.एम.एल.चे मुख्यालय पुण्यामधील स्वारगेट येथे आहे.
मुंबईतील बेस्ट नंतर सर्वात मोठी बससेवा म्हणून पी.एम.पी.एम.एलचे नाव घेतले जाते.
पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.