पुंडलिक हा विठ्ठलाचा भक्त होता. प्रचलित आख्यायिकांनुसार पुंडलिक पंढरपुरात स्वतःच्या आईवडिलांची सेवा करीत असताना अचानक तेथे विठ्ठल(पांडुरंग) आला. त्याच्यासाठी पुंडलिकाने पुढे केलेल्या विटेवर तो कंबरेवर हात ठेवून उभा राहिला. पंढरपूरच्या देवळात मूर्तिरूपाने विठ्ठल अजूनही तसाच उभा आहे, असे मानले जाते.
स्कंद-पुराणानुसार भक्त पुंडलिकाने मागितलेला वर खालीलप्रमाणे आहे.
इति स्तुत्वा ततो देवं प्राह गद्गदया गिरा ।
अनेनैव स्वरूपेण त्वया स्थेयं ममान्तिके ॥
ज्ञानविज्ञानहीनानां मूढानां पापिनामपि ।
दर्शनान्ते भवेन्मोक्षः प्रार्थयामि पुनः पुनः ॥
– स्कन्दपुराण
पुंडलिक
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.