पंढरपूर

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

पंढरपूर

पंढरपूर हे शहर पंढरपूर तालुक्याचे प्रशासकीय ठिकाण असून हे भीमा नदीच्या (चंद्रभागा) काठावर वसले आहे.



काही मध्ययुगीन कानडी शिलालेखांत पंढरपूर या क्षेत्राचे नाव नाव पंडरगे असे आहे.

मूळ नाव पुंडरीकपूर असे असावे किंवा पांढरी (गावाची वेस) या शब्दाशीही प्रस्तुत क्षेत्राच्या नावाचा संबंध असण्याची शक्यता आहे.

क्षेत्रमहात्म्यामुळे पंढरपूराला दक्षिण काशी व तसेच विठ्ठलाला महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणतात.



पंढरपूराला पंढरी असेही म्हणतात.

पंढरपूरची लोकसंख्या ५३,६३८ (१९७१) इतकी आहे. पंढरपूर हे सोलापूरच्या पश्चिमेस ७१ किमी. वर, भीमा नदीच्या उजव्या तीरावर, समुद्रसपाटीपासून ४५० मीटर उंचीवर आहे. हे मिरज-कुर्डुवाडी रुंदमापी लोहमार्गावरील स्थानक असून येथून महाराष्ट्रात सगळीकडे जाणारी बस वाहतुकीची सोय आहे.

पंढरपूरातील विठ्ठल मंदिरामुळे हे वारकऱ्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. या मंदिराला आठ प्रवेशद्वारे आहेत. त्यातील पूर्वेकडील प्रवेशद्वाराला नामदेवांचे नाव देण्यात आले आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी पायी चालत येतात. हे विठ्ठलमंदिर अवघ्या महाराष्ट्राचे एक चिरंतन स्फूर्तिस्थान आहे. गोरगरिबांचा देव म्हणून श्री विठ्ठलाची ओळख आहे. पंढरपूरच्या उत्तर दिशेला कैकाडी महाराज यांचा मठ आहे तिथे गुंफेत सर्व साधु संतांच्या मूर्ती आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →