पी.सी. अलेक्झांडर

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

डॉ. पदिंजरेतलकल चेरियन अलेक्झांडर (मल्याळम: പി.സി. അലക്സാണ്ടർ ; रोमन लिपी: Padinjarethalakal Cherian Alexander ;), अर्थात पी.सी. अलेक्झांडर (रोमन लिपी: P.C. Alexander ;), (२० मार्च, इ.स. १९२१ - १० ऑगस्ट, इ.स. २०११) हे भारतातील मल्याळी राजकारणी व मुलकी सेवेतील माजी अधिकारी होते. ते इ.स. १९८८ ते इ.स. १९९० या कालखंडात तमिळनाडूचे, तर इ.स. १९९३ ते इ.स. २००२ या कालखंडात महाराष्ट्राचे राज्यपाल होते. इ.स. १९९६ ते इ.स. १९९८ या काळात त्यांनी गोव्याच्या राज्यपालपदाचीही धुरा वाहिली. २९ जुलै, इ.स. २००२ ते २ एप्रिल, इ.स. २००८ या काळात त्यांनी भारताच्या राज्यसभेत अपक्ष राहून महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →