पिवळी मार्गिका ही इंदूर मेट्रोची पहिली जलद मार्गिका आहे. या मार्गिकेची एकूण लांबी ३३.५३ किलोमीटर आहे आणि या मार्गिकेवर देवी अहिल्याबाई होळकर टर्मिनल ते विमानतळापर्यंत एकूण २९ मेट्रो स्थानके आहेत. देवी अहिल्याबाई होळकर टर्मिनल ते रॅडिसन चौकापर्यंतचा १६.२१ किमी लांबीचा प्राधान्य विभाग बांधकामाधीन आहे.
देवी अहिल्याबाई होळकर टर्मिनल ते वीरंगना झलकारीबाई स्थानकाला जोडणारा ६ किमीचा पहिला टप्पा ३१ मे २०२५ रोजी कार्यान्वित झाला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या मार्गाचे अधिकृत उद्घाटन केले.
शहरातील सर्वात व्यस्त वाहतूकमार्गाला सेवा देण्याच्या उद्देशाने इंदूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या विस्ताराचा भाग म्हणून पिवळ्या मार्गिकेचे बांधकाम हाती घेण्यात आले. या प्रकल्पाला आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँक (AIIB) सारख्या संस्थांकडून निधी मिळाला. २०२५ मध्ये ६ किमीचा हा भाग उघडण्यात आला आणि एकूण काम २०२६ मध्ये पूर्ण होणार आहे
पिवळी मार्गिका (इंदूर मेट्रो)
या विषयातील रहस्ये उलगडा.