पितृपक्ष

या विषयातील रहस्ये उलगडा.

पितृपक्ष

पितृपक्ष म्हणजे भाद्रपद महिन्याचा कृष्ण पक्ष होय. (मध्य प्रदेश आदी पौर्णिमान्त महिने पाळणाऱ्या प्रदेशांत हा आश्विन महिन्यातील पहिला पंधरवडा असतो.) हा भाद्रपद महिन्यातला कृष्ण पक्ष असतो. यास 'महालय' असेही नाव आहे. आपल्या नातेवाइकाचा मृत्यू ज्या तिथीस झाला असेल, त्या नातेवाइकाचे श्राद्ध, पितृपक्षातील त्याच तिथीस करण्याची हिंदू परंपरा आहे. या निमित्ताने आपल्या दिवंगत पूर्वजांचे स्मरण केले जाते. या श्राद्धविधीत आपल्या गोत्रातील ज्ञात-अज्ञात अशा सर्वांचे पिंडरूपाने पूजन केले जाते. या पक्षात यमलोकातून पितर (आपले मृत पूर्वज) आपल्या कुटुंबीयांच्या घरी वास्तव्य करण्यासाठी येतात अशी समजूत असल्याने, हा पक्ष (पंधरवडा) अशा पितृकार्याला योग्य समजला जातो. भाद्रपद पौर्णिमेपासून अमावास्येपर्यंत रोज महालय श्राद्ध करावे असे शास्त्रवचन आहे. पण ते शक्य नसल्यास ज्या तिथीला आपला पिता मृत झाला असेल, त्या दिवशी या पक्षात सर्व पितरांच्या उद्देशाने महालय श्राद्ध करण्याचा परिपाठ आहे.



पितृपक्षात आपल्या दिवंगत पूर्वजांचे स्मरण करणे विहित असल्याने अन्य शुभ कार्ये वा उत्सव या काळात न करणयाचा संकेत हिंदू धर्मशास्त्रात रूढ आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →