कार्तिक शुद्ध एकादशी

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

कार्तिक शुद्ध एकादशी

कार्तिक शुद्ध एकादशी ही कार्तिक महिन्याच्या शुद्ध पक्षातील अकरावी तिथी आहे.



कार्तिक शुद्ध एकादशीला प्रबोधिनी एकादशी असेही म्हणतात. देवशयनी आषाढ एकादशीला निद्रिस्त झालेला भगवान विष्णू प्रबोधिनी एकादशीला जागा होतो अशी कल्पना यामागे आहे. कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंतच्या काळात कोणत्याही एखाद्या दिवशी घरच्या घरी तुळशीचे लग्न करण्याची प्रथा आहे. तुलसी विवाहात तुळशीचा विवाह कृष्णाशी (विष्णूशी) लावतात.



प्रबोधिनी एकादशीला देव प्रबोधिनी असेही म्हणतात, हिंदीत देवउठनी एकादशी किंवा देवोत्थनी एकादशी.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →