कोणत्याही परिसंस्थेतील प्रत्येक पोषणपातळीवरील जैववस्तुमान किंवा जैववस्तुमानाची उत्पादकता, सजीवांची संख्या, ऊर्जा-विनिमयाची पातळी यांसंबंधीची माहिती ही आलेख स्वरूपात मांडली जाते, तिला पारिस्थितिकीय स्तूप म्हणतात. ब्रिटनचे प्राणिवैज्ञानिक आणि पारिस्थितिकीतज्ज्ञ चार्ल्स एल्टन यांनी ही संकल्पना १९२७ मध्ये प्रथम मांडली. एल्टन यांना असे दिसून आले की, ज्या स्वयंपोषी वनस्पतींवर तृणभक्षक प्राणी जगतात, त्या वनस्पतींच्या तुलनेत तृणभक्षक प्राण्यांची संख्या कमी असते. तसेच ज्या तृणभक्षक प्राण्यांवर मांसभक्षक प्राणी जगतात, त्या प्राण्यांची संख्या तृणभक्षक प्राण्यांच्या तुलनेने कमी असते. एल्टन यांनी सजीवांची ही संख्या आलेखाच्या स्वरूपात एकावर एक मांडली, तेव्हा स्तूपासारखी रचना तयार झाली. म्हणून या आलेखाच्या प्रारूपाला एल्टन स्तूप असेही म्हणतात.
पारिस्थितिकीय स्तूप तीन प्रकारचे असतात :
ऊर्जा स्तूप
संख्या स्तूप
जैववस्तुमान स्तूप
पारिस्थितिकीय स्तूप
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.