पारसिकचा बोगदा महाराष्ट्राच्या ठाणे शहराजवळील पारसिकाच्या डोंगरात केलेला बोगदा आहे. मुंबई कल्याण रेल्वेमार्गाच्या दोन मुख्य मार्गिका यातून जातात. हा बोगदा १.३१७ किमी लांबीचा असून भारतीय रेल्वेवरील एक किमीपेक्षा जास्त लांबीचा हा पहिला बोगदा होता व बांधला गेला तेव्हा आशियातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक लांबीचा बोगदा होता. या बोगद्यामुळे मुंबई ते कल्याणमधील अंतर ९.६ किमीने कमी झाले आहे.
पारसिकाच्या डोंगरातून अधिक दोन बोगदे बांधण्याचे नियोजन आहे. यातील एक बोगदा सध्याच्या बोगद्याला समांतर असेल व यातून मालगाड्या धावतील तर दुसरा बोगदा मुंब्रा आणि कळवा रेल्वे स्थानकांच्या मध्ये असेल.
पारसिक बोगदा
थोडक्यात पण महत्त्वाचे.