झोजी ला बोगदा

या विषयातील रहस्ये उलगडा.

झोजी ला बोगदा

झोजीला बोगदा हा हिमालयात भारतीय केंद्रशासित प्रदेश लडाख मध्ये कारगिल जिल्ह्यातील सोनमर्ग आणि द्रास दरम्यान झोजी ला खिंडीत असलेला १४.२ किमी लांबीचा बोगदा आहे. या रस्त्याचे बांधकाम २०१८ मध्ये सुरू झाले असून पूर्ण होण्यास सुमारे ५-७ वर्षे अपेक्षित आहेत . ६.५ किमी लांब झेड-मोर्ह बोगद्यासह (झोजीला बोगद्या पासून श्रीनागरच्या दिशेने २२ किमी अंतरावर आहे) हा बोगदा श्रीनगर आणि कारगिल दरम्यान वर्षभर अखंडित सेवा सुनिश्चित करेल जी सध्या ३,५२८ मी (११,५७८ फूट)च्या उंचीवर असलेल्या झोजीला खिंडीत बर्फवृष्टीमुळे सुमारे सात महिने बंद असते. झोजी ला सोनमर्गपासून १५ कि.मी. अंतरावर आहे आणि लडाखमधील द्रास आणि कारगिल सोबत जोडणारा एक महत्त्वपूर्ण दुवा आहे परंतु हिवाळ्यात ६-७ महिने (नोव्हेंबर ते मे) हिमवृष्टी आणि हिम अवधावामुळे बंद राहतो.

हि खिंड पार करण्यास ३ तासांहून अधिक वेळ लागतो परंतु बोगद्यामुळे हा वेळ कमी होईल. हा बोगदा लष्कराची आणि लडाखी जनतेची रणनीतिक गरज होती कारण हा मार्ग नियंत्रण रेषे जवळ असून शत्रूंकडून प्रतिकूल कृतींमुळे असुरक्षित आहे. १९४७-४८ च्या भारत पाकिस्तान युद्धात ऑपरेशन बायसन अंतर्गत झोजीला पुन्हा पाकिस्तानी हल्लेखोरांकडून पकडण्यात आले.

झोजीला बोगद्याच्या प्रकल्पाला जानेवारी २०१८ मध्ये भारत सरकारने मंजूरी दिली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मे २०१८ मध्ये बोगद्याचे बांधकाम सुरू झाले. बोगदा ईपीसी मोड (अभियांत्रिकी, खरेदी, बांधकाम) अंतर्गत बांधला जाईल ज्यामध्ये भारत सरकार पैसे प्रदान करेल आणि कार्यकारी एजन्सी बांधकाम करेल आणि नंतर प्रकल्प भारत सरकारला देईल. पूर्वी हे पीपीपी मोडमध्ये बांधले जायचे होते जेथे खाजगी पक्ष गुंतवणूक करून नंतर टोल मार्गे वसूल करायचे होते पण २०१३ पासून पाच वेळा प्रयत्न केल्यावरही एका वेळी एकच बोली लावली गेली आणि इतर वेळी केवळ एका खासगी पक्षाने स्वारस्य दाखवले. प्रत्येक वेळी बोली रद्द केली गेली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →