अटल बोगदा

यामागील विज्ञान आणि इतिहास.

अटल बोगदा

अटल बोगदा, रोहतांग (पूर्वीचे नाव: रोहतांग बोगदा) हा माजी भारतीय पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावावर असलेले, लेहवरील हिमालयातील पूर्व पीर पंजाल पर्वतरांगेत रोहतांग खिंडीत बनवलेला एक बोगदा आहे. हा ८.९ किमी (५.५ मैल) लांबीचा बोगदा आहे. हा भारतातील सर्वात लांब असलेल्या बोगद्यांपैकी एक असेल. यामुळे मनाली आणि लेह दरम्यानचे अंतर ४६ किमी (२८.६ मैल) ने कमी होण्याची शक्यता आहे. या बोगद्याची उंची ३,१०० मीटर (१०,१७१ फूट) आहे तर रोहतांग समुद्रसपाटीपासून ३,९७८ मीटर (१३,०५१ फूट) उंचीवर आहे.

लेह-मनाली महामार्ग लडाखकडे जाणाऱ्या दोन मार्गांपैकी एक आहे. रोहतांग खिंडीत हिवाळ्याच्या महिन्यांत जोरदार बर्फवृष्टी होते आणि त्यामुळे वर्षातील फक्त चार महिनेच हा रस्ता वाहतुकीसाठी खुला असतो. हिवाळ्या दरम्यान या बोगद्यामुळे हा महामार्ग आता खुला ठेवता येईल. लेहला जाणारा दुसरा मार्ग श्रीनगर-द्रस-कारगिल-लेह महामार्गावरील झोजी ला खिंडीतून जातो आणि वर्षातून चार महिने बर्फामुळे तो बंद असतो. झोजी ला पास अंतर्गत १४ किमी (८.७ मैल) लांबीच्या बोगद्याचे नियोजन करण्यात आले आहे. पश्चिमेकडील अक्साई चिन आणि सियाचीन ग्लेशियरला सामोरे जाणाऱ्या सैन्यला पुरवठा करण्यासाठी हे दोन मार्ग महत्त्वाचे आहेत.

अटल बोगदा तंतोतंत रोहतांग खिंडीत नाही तर तो खिंडीच्या थोडासा पश्चिमेला आहे. दक्षिण प्रवेशद्वार 32.3642°N 77.1330°E / 32.3642; 77.1330 वर बियास नदीच्या दुसऱ्या बाजूला धुंडीच्या उत्तरेस आहे. बोगद्याच्या उत्तरेकडील तोंड विद्यमान लेह - मनाली महामार्गला मिळते. ते तेलिंग गावाच्या जवळ 32.4388°N 77.1642°E / 32.4388; 77.1642 आहे. पूर्वेकडे ग्राम्फुपासून १० किमी (६.२ मैल) जे विद्यमान महामार्गावरील रोहतांग खिंडी नंतरचे पहिले गाव आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →