लडाख

थोडक्यात पण महत्त्वाचे.

लडाख

लडाख हा भारताचा एक केंद्रशासित प्रदेश आहे. हा भारतीय उपखंडातील उत्तर भागात आहे आणि काराकोरमच्या आसपास आहे. लडाख हा भारतातील विखुरलेल्या प्रदेशांपैकी एक आहे आणि तिची संस्कृती आणि इतिहास तिबेटशी संबंधित आहे. हा दूरदूरच्या पर्वतीय सौंदर्यासाठी आणि संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे.

लडाखच्या पूर्वेस तिबेट, दक्षिणेस लाहौल व स्पीती विभाग, पश्चिमेस जम्मू आणि काश्मीर व पाकिस्तानातील गिलगिट-बाल्टिस्तान हे प्रदेश, उत्तरेस काराकोरम खिंडी आणि पश्चिमेस चीनच्या शिंच्यांगच्या नैर्ऋत्येला याची सीमा आहे. लडाख हा काराकोरममधील सियाचीन हिमनदीपासून दक्षिणेस मुख्य ग्रेट हिमालयापर्यंत पसरलेला आहे. ऑगस्ट २०१९ मध्ये, भारतीय संसदेच्या कायद्यानुसार लडाख हा ३१ ऑक्टोबर २०१९ रोजी केंद्रशासित प्रदेश झाला. लडाखी ही येथील प्रमुख भाषा आहे.

एकेकाळी लडाखला आंतरराष्ट्रीय व्यापार मार्गांच्या महामार्ग रस्त्यावरच्या जागेचे अतिशय महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले होते. परंतु, चिनी अधिकाऱ्यांनी १९६० च्या दशकात लडाखची तिबेट व मध्य आशिया यांच्यामधली सीमा बंद केल्यामुळे पर्यटन वगळता आंतरराष्ट्रीय व्यापार कमी झाला. १९७४पासून, भारत सरकारने लडाखमधील पर्यटनवृद्धीस यशस्वीरीत्या प्रोत्साहित केले आहे. रणनीतिदृष्ट्या महत्त्वाचा भाग असलेला जम्मू-काश्मीरचा लडाख हा भाग असल्याने या भागात भारतीय लष्कराची मजबूत उपस्थिती आहे. ऐतिहासिकदृष्ट्या, त्यामध्ये बाल्टिस्तान (बाल्टीयुल) खोरे (सध्या पाकिस्तानात), संपूर्ण सिंधू खोरे, दक्षिण दिशेला दुर्गम झांस्कर, लाहौल आणि स्पीती, पूर्वेकडील रुडोक प्रदेश आणि गुगे, नगारी यांचा बराचसा भाग आहे. ईशान्य (कुण लुन पर्वतापर्यंत विस्तारित), आणि लडाख रेंजमधील 'खारडोंग ला'च्या उत्तरेस नुब्रा व्हॅली. अक्साई चीन हा चीन आणि भारत यांच्यातील विवादित सीमा क्षेत्रांपैकी एक आहे. विवादित प्रदेशाच्या काही भागावर चीनची सत्ता आहे. पण, भारताने हा विवादित प्रदेश जम्मू-काश्मीर राज्याच्या लडाख प्रदेशाचा एक भाग म्हणूनही स्वीकारला आहे. सन १९६२मध्ये, चीन आणि भारताचे अक्साई चीन आणि अरुणाचल प्रदेश यांच्या मालकीबद्दल युद्ध झाले होते. मात्र,१९९३ व१९९६मध्ये दोन्ही देशांनी वास्तविक नियंत्रण रेषाचा सन्मान करण्यासाठी करार केले आहेत.

लेह हे लडाखमधील सर्वात मोठे शहर आहे. हीच लडाखची राजधानीसुद्धा आहे. त्यानंतर कारगील आहे. या प्रदेशातील मुख्य धार्मिक गट म्हणजे मुस्लिम (मुख्यत: शिया) (४६%) आणि बौद्ध (मुख्यत: तिबेटी) (४०%) होय, याशिवाय येथे हिंदू (१२%) आणि शीख (२%) हेही आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →