पारशिवनी तालुका

या विषयावर तज्ञ बना.

पारशिवनी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्याचा एक तालुका आहे.

हा तालुका घनदाट जंगल, पहाड, टेकड्या, जलाशये अशा निसर्गरम्य गोष्टींनी व्याप्त असून, त्याचे क्षेत्रफळ ५४,२५० हेक्टर आहे.

या तालुक्यात सुमारे ११७ गावे आहेत.

या तालुक्यात, निसर्गसानिध्यामुळे अनेक पर्यटनस्थळे सापडतात. पेंच राष्ट्रीय उद्यानचे धरण, कुंवारा भिवसन, गायमुख, हेमाडपंथी पुरातन देवालये, व्याघ्र प्रकल्प इ. (नरहर ते घाटपेंढरी) या घनदाट जंगलास नॅशनल पार्क घोषित करण्यात आले आहे.



या गावात एक ४५० वर्षे प्राचीन दिगंबर जैन मंदिर आहे. मूलनायक पार्श्वनाथ भगवंतांची व आदिनाथ भगवंतांची अतिशयकारी प्रतिमा आहे.

मंदिराच्या दर्शनार्थ संपूर्ण भारतभरातील दर्शनार्थी येतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →