पारलिंगीद्वेष म्हणजे पारलिंगी लोकांबद्दल नकारात्मक दृष्टिकोन, भावना किंवा कृती प्रतिबिंबित करणाऱ्या कल्पना आणि घटनांचा संग्रह. यात भीती, तिरस्कार, द्वेष, हिंसा, राग किंवा सामाजिक लिंग अपेक्षा पूर्ण न करणाऱ्या लोकांबद्दल अस्वस्थता यांचा समावेश असू शकतो. हे बहुतेकदा समलैंगिकद्वेषासोबत व्यक्त केले जाते म्हणून पारलिंगीद्वेष हा समलैंगिकद्वेषाचा एक पैलू मानले जातो. पारलिंगीद्वेष, हा वंशवाद, जातीवाद, आणि लिंगभेदासारखाच पूर्वग्रह आणि भेदभावाचा एक प्रकार आहे. आणि कृष्णवर्णीय किंवा तथाकथित "खालच्या" जातीचे पारलिंगी व्यक्ती बहुतेकदा तिन्ही प्रकारच्या भेदभावाचे बळी असतात.
हिंसाचार आणि इतर धोक्यांच्या वाढत्या धोक्यांव्यतिरिक्त, पारलिंगीद्वेषामुळे निर्माण होणारा ताण नकारात्मक भावनिक परिणामांना कारणीभूत ठरू शकतो. याचा परिणाम म्हणजे मादक पदार्थांचा गैरवापर, घरातून पळून जाणे (अल्पवयीन मुलांसाठी) आणि आत्महत्या करणे असे असू शकतात.
पाश्चात्य आणि विकसनशील देश हळूहळू भेदभाव विरोधी आणि समान संधींची धोरणे स्थापित करण्याकडे वाटचाल करत आहेत. इतर लिंगभाव ओळखींची सामाजिक स्वीकृती सुधारण्यासाठी एल.जी.बी.टी. समुदायाशी संबंधित मोहिमा देखील जगभरात पसरवल्या जात आहेत. संयुक्त राष्ट्रांची "स्ट्रिप द स्टिग्मा" मोहीम ही असाच एक प्रयत्न आहे.
लिंग परिवर्तन प्रक्रियेच्या आधी आणि नंतर अनेक पारलिंगी लोकांमध्ये चुकीची लिंगभाव ओळख पटवण्याचे अनुभव सामान्य आहेत पारलिंगी व्यक्तींना डॉक्टर, पोलिस, मीडिया आणि समवयस्कांकडून नियमितपणे चुकीच्या लिंगभाव ओळखीने नेमले आणि ओळखले जाते आणि पारलिंगी व्यक्ती या अनुभवांचे वर्णन "वेदनादायक", "दुखावणारे", "क्रूर", , आणि "जीवन अधिक कठीण करणारे" असे सांगतात. । अॅडोलेसेंट हेल्थ या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या १२९ पारलिंगी आणि इतर लिंगभाव असणाऱ्या करणाऱ्या तरुणांच्या २०१८ च्या अभ्यासात असे आढळून आले की "त्यांच्या निवडलेल्या नावाचा वापर सामाजिक संदर्भात केल्याने, नैराश्याच्या लक्षणांमध्ये, आत्महत्येच्या विचारसरणीत आणि आत्महत्येच्या वर्तनात सांख्यिकीयदृष्ट्या लक्षणीय घट झाली." पारलिंगी व्यक्तींना जाणूनबुजून चुकीच्या लिंगभावाने ओळखणे अत्यंत आक्षेपार्ह वाटते.
पारलिंगीद्वेष
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.