पाञ्चजन्य (साप्ताहिक)

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

पाञ्चजन्य (साप्ताहिक)

पाञ्चजन्य हे एक हिंदी भाषेतले साप्ताहिक प्रकाशन आहे. याचा उल्लेख पाञ्चजन्य आणि पांचजन्य असाही केलेला आढळतो. हे भारत राष्ट्रवादी आणि भारताच्या हीताची बाजू मांडणारे प्रकाशन आहे असे दिसून येते. देशातील राष्ट्रवादाची भावना बळकट करण्यात पंचजन्य पत्रिकाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या प्रकाशनाने भारतीयांसाठी महत्त्वाच्या असलेल्या भारत विषयक बाबींवर आवाज उठवले आहेत. १९५९ मध्ये कम्युनिस्ट चीनकडून तिबेटच्या स्वातंत्र्याचे अपहरण आणि दलाई लामांची हकालपट्टी, १९६२ मध्ये भारतावर चीनने केलेल्या हल्ल्यासाठी नेहरूंचे अयशस्वी परराष्ट्र धोरण आणि संरक्षण धोरण, १९७२ मध्ये भारतीय सैन्याचा विजय सिमला करार असे अनेक विषय पांचजन्य या साप्ताहिकाने हाताळले आहेत असे दिसते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →