राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) ही एक हिंदूत्ववादी सामाजिक आणि कौटुंबिक संघटना आहे. सामाजिक व सांस्कृतिक संस्था या स्वरूपात ही संघटना काम करीत असते. इ. स. १९९०च्या दशकापर्यंत या संस्थेने राष्ट्रभक्ती व संस्कृतीच्या प्रसार प्रसार व संवर्धनासाठी अनेक शाळा आणि समाजोपयोगी निस्वार्थ सेवाभावी कार्य स्थापन केलेले आहे. नैसर्गिक आपत्तींच्या काळातील मदतकार्यासाठी आणि पुनर्वसनातील भूमिकेसाठी या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक अत्यंत समर्पित होऊन मदत करत असतात.
जागृत, सशक्त संघटीत, समर्थ राष्ट्राच्या निर्माणासाठी संघाचे अथक अविरत प्रयत्न सुरू आहेत. निद्रिस्त भारत पुन्हा जागृत व्हावा यासाठी आपल्या उपसंस्थाद्वारे अनेक माध्यमातून कार्य सुरू असते. सर्वस्पर्शी व सर्वव्यापी व सर्वग्राही होऊन देशाच्या कणकणातून राष्ट्राभिमान जागृत करण्यासाठी संघ सतत प्रयत्नशील असतो.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
यामागील विज्ञान आणि इतिहास.